Mems

The Blind Relief Association Nagpur’s

Mundle English Medium School

(Integrated)

South Ambazari Road, Opposite Government ITI College, Near Dikshabhumi, Nagpur

मागे वळून पाहताना… – Mems

           एप्रिल २०२३ ला The Blind Relief Association Nagpur’s Mundle English Medium School ला २५ वर्ष पूर्ण झाली. अजूनही तो दिवस डोळ्यांपुढे अगदी स्पष्टपणे उभा राहतो ज्या दिवशी मी शिक्षकपदासाठी interview करता आले होते. शाळेच्या इमारतीच्या भिंती केवळ ७/८ फूट बांधल्या गेल्या होत्या. काही दिवसातच निवड झाल्याचा निरोप मिळाला आणि माझी या शाळेशी नाळ जोडल्या गेली.

           केवळ १०० मुलं बरोबर सुरु झालेला हा प्रवास आज १३०० मुलांबरोबर अजुनही तितक्याच उत्साहात सुरु आहे आणि पुढेही सुरूच राहील.

          सुरुवातीला तळ मजल्या वरच्या वर्ग खोल्या, नंतर पहिला मजला, मग दुसरा मजला, त्यानंतर Science labs, वाचनालय, Maths labs, असं करत करत आज शाला ३० वर्गखोल्या, सुसज्ज ऑफीस, अत्यंत अद्ययावत् Computer labs, Smart boards आणि नुकतेच तळ मजल्यावरील खोल्यांचे झालेले renovation याने नटली आहे. The Blind Relief Association Nagpur’s च्या कार्यकारिणीने प्रोत्साहन कौतुकाची थाप आणि त्यांची दूरदृष्टी हे सर्व आमच्याबरोबर असल्याने आज शाळा नागपूर शहरातील नामांकित शाळा मधील एक शाला समजली जाते.

          शाळेची पाळेमुळे सर्व बाजूंनी पसरली असून आता तिचा पाया भक्कम झाला आहे आणि त्यामुळेच ती सशक्तपणे उभी आहे.

         २५ वर्षापूर्वी ५-६ वर्षाची दुडूदुडू धावत शाळेत येणारी मुलं आता मोठमोठ्या पदांवर रुजू झालेली आहेत आणि आता त्याची मुलं त्याच्याच सारखी धावत शाळेत येतात आहेत. एक पिढी इथे शिकून आता पुढची पिढी शाळेत येते आहे… इतकी वर्ष भुरकन् कधी उडून गेली हे कळलच नाही.

          आज मागे वळून बघतांना जाणवतं की आम्ही किती भाग्यवान आहोत की आम्ही या संस्थेशी आणि शाळेशी जोडल्या गेलो. आता आमचेही केस पांढरे झाले आहेत. ‘आई’ म्हणवल्या जाणाऱ्या आम्ही आता ‘आजी’ म्हणून शोभतो आहोत काही वर्षांनी शिक्षिका म्हणून इथे पुढची पिढी येणार आणि आम्ही खऱ्या अर्थाने आमचं आजीपण enjoy करणार.

           पण मला खात्री आहे की आमची ही शाला अशीच उत्तरोत्तर प्रगतीपथावर मार्गक्रमण करत राहील आणि आम्ही शाळेच्या सुवर्ण महोत्सवाला हजर राहू आणि शाळेच्या पारंब्या सर्वदूर पसरलेल्या पाहून परत एकदा समाधानी होवू.   

 

     – सौ. मेघा पाध्ये

मुख्याध्यापिका (प्राथमिक)