समाजाच्या चालीरीतीतून अनुभव जन्म घेतो
अनुभवानेच माणूस चांगला वाईट आणि शहाणा होतो
चांगल्या वाईट माणसाची ओळख अनुभव आल्यावाचून होत नाही
कोण आपले कोण परके याची पारख होत नाही
अनुभवाने माणूस घडतो बिघडतो शिस्तीचे धडे घेतो
चांगल्या वाईट अनुभवानेच माणूस प्रलोभनातून बचावतो
अनुभव घेतल्या वाचून जगण्याची कला उमगत नाही
अनुभव घेतल्या वाचून दुनियादारी समजत नाही
अनुभवाचे बोल जुन्या पिढीकडून नव्याने शिकावे
चार पावसाळे जास्ती प्रौढांनी सोसलेले असावे
असेच नाही राजे हो त्यांचे केस पांढरे झाले
अनुभव आल्या वाचून कोणाचे जीवन सफल झाले?
अनुभवाचे बोल आहे आपल्या जीवनाची अनमोल शिदोरी
ज्यांनी जपले नाही हे क्षण तो झाला आयुष्यात भिकारी
प्रत्येक वेळी अनुभव घ्यायची गरज पडत नाही
पुढच्या ठेच मागचा शहाणा हीच अनुभवाची खरी गुरुकिल्ली
अनुभवाने अनुभवले जाते अनुभवाचे बोल आयुष्य कितीही खडतर असले
तरी मानवा तू श्रीहरी बोल श्रीहरी बोल
– सौ. कलाश्री बरडे