आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखविली. आमच्या मिसाईल मॅनने अणू बॉम्बची केवळ चाचणी घेऊन बलाढय राष्ट्रांमध्ये भारताला नेऊन बसविले. आमच्या आजच्या पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईकने साऱ्या जगाला अशक्य काहीच नाही याची जाणीव करून दिली. सूर्याचा आवाज रेकॉर्ड करून नासानेही अशक्य अशा आकाशाला गवसणी घालून अनेक शोध लावले. खरचं जीवनात यशस्वी होण्यासाठी अशक्यांना शक्य करणे हेच आमच्या जीवनाचे ध्येय नाही का? प्रत्येकाच ध्येय वेगळ राहणार. ते मिळविण्याकरिता आपल्याकडून होणारे प्रयत्नच ते ध्येय साध्य करू शकतील. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे अशा म्हणी केवळ परीक्षेपुरत्या नव्हे तर आचरणात आणण्यासाठी आहेत. चित्रकाराला चित्र काढण्यासाठी एक कोरा पेपर दिला जातो. तो आपल्या कल्पनेने त्यात विविध रंगांची उधळण करून एक सुंदरस चित्र रेखाटतो. आपलं जीवन म्हणजे कोरा कागद. त्यात आपल्या विविध गुणांची उधळण करून ते जीवन सफल बनवायचं आहे. ही सफलता आम्ही केवळ चार गुणांच्या संपत्तीने मिळवू शकतो. ती कुठली तर –
जगात सर्वात मोठी संपत्ती ‘बुध्दी’
सर्वात चांगलं हत्यार ‘धैर्य’
सर्वात चांगली सुरक्षा ‘विश्वास’
सर्वात चांगल भाष्य ‘हसू’
ही चतुःसुत्री लक्षात ठेऊन त्या प्रमाणे वागायला प्रारंभ करायला हवा. प्रत्येकाच आयुष्य वेगळं परंतू क्रिकेट खेळामध्ये पीच कशी आहे हे ओळखून बॉलिंग करणारा यशस्वी होतो ना! तसंच आयुष्य रूपी पीचवर अनेक अडचणी, खाचखळगे हे राहणारच. त्यांना गृहीत धरून त्यावर मात करणे हेच ध्येय असायला हवे त्यासाठी मुहूर्त नको असतो. तो प्रयत्न आजच करायचा असतो.
आज म्हणजे TODAY. याची व्याख्याच आम्हाला सर्व काही सांगून जाते.
T = This is an
O = Opportunity to
D = Do
A = A work, better than
Y = Yesterday.
तेव्हा आयुष्यात अशक्य असं काहीही नाही, हा शब्दच मुळी, मी ते शक्य करू शकतो असं म्हणुन जातो.