Mems

The Blind Relief Association Nagpur’s

Dr. Dinkar W. Hardas

Mundle English Medium School

(Integrated)

South Ambazari Road, Opposite Government ITI College, Near Dikshabhumi, Nagpur

लेखणीचा प्रवास – Mems

एके वर्षी लेखणीने उभा केला, “निश्चयाचा महामेरू”

शिवरायांच्या तेजस्वी शौर्यने लेखणी झाली सुरू |

 

निश्चय, शौर्य, स्वराज्याचा घुमला हुंकार

इतिहास बोलता झाला, शब्दांना मिळाला आकार |

 

स्वराज्याचा हुंकार, इतिहासाचा अभिमान

शब्दातून साकारले गेले, शौर्याचे महान गान |

 

दुसरे वर्षी कोवळ्या स्वरात रामकथा फुलली

लव-कुशांच्या ओठातून, संस्कृती खुलली |

 

धर्म, निती, संस्कारांची जपली ती वाट

“बाल रामायण” झाले, जीवन मूल्यांचे पाठ |

 

तिसरे वर्षी कीर्तनात रंगली भक्तीची वारी

विठ्ठल रूप साकारले “माझा विठ्ठल माझी वारी”  |

 

अभंगांच्या नादात, न्हाऊन निघाला रंग मंच सारा

पंढरी अवतरली, शब्द झाले भक्ती धारा |

 

तीन वर्षे लेखणीला, लाभली सर्जनाची वाट,

शाळेने दिली संधी, हेच भाग्य पडले पदरात |

 

या लेखणीच्या प्रवासात, मिळाले संस्कारधन 

ऋणी राहील सदैव, शाळेच्या चरणी माझे तन-मन-धन |

 

– सौ. वेदश्री वेदान्त मांडवगणे

(संगीत विभाग प्रमुख)