Mems

The Blind Relief Association Nagpur’s

Dr. Dinkar W. Hardas

Mundle English Medium School

(Integrated)

South Ambazari Road, Opposite Government ITI College, Near Dikshabhumi, Nagpur

नाते शिक्षक विद्यार्थ्यांचे – Mems

नम्र विद्यार्थ्यांसमोर शिक्षक ठेवतो

ज्ञानाचे अपार भंडार 

भविष्य उजळून ज्ञानाची उपसतो तलवार …. || १ ||

हीच असावी विद्या विनयेन शोभतेची प्रगल्भता

वाढवी शिक्षण पद्धतीची गुणवत्ता …. || २ ||

नम्रतेने अज्ञानाचा अंधार दूर सारता

शिक्षणाचे बळ दाखवी क्षमता…. || ३ ||

होई कामे नम्रपणे विनंती करीता

गिरवी आदरपूर्वक सन्मानाचा कित्ता…. || ४ ||

नम्र शिक्षक आवडे विद्यार्थ्यांना खास

मांडती शिक्षक विद्यार्थी नात्यातील खरी आरास …. || ५ ||

नम्रता साधते शिक्षक विद्यार्थी नात्यातील गोडवा

दूर करते अहंकाराचा वणवा …. || ६ ||

शिक्षण क्षेत्रातील ही खरी दोघांची विशेषता

दूर करील अज्ञानाच्या अंधकाराची कमतरता …. || ७ ||

नम्रता हीच आपल्या संस्कृतीची शिकवण

म्हणूनच होते लखलखत्या ज्ञानाची उधळण…. || ८ ||

 

– सौ. संध्या चांदे

(सहाय्यक मराठी शिक्षिका)